सुगम तबला वादन अभ्यासक्रम – प्रथमा

  • ताल दादरा, रूपक व त्रिताल यांची माहिती मात्र, खंड, टाळ्या काल वगैरे सह हाताने टाळ्या देऊन बोल म्हणून दाखवणे व तबल्यावर वाजविणे. ( मध्य व द्रुत लयीत )
  • या परीक्षेचा मुख्य ताल दादरा आहे. त्या मधले वेगवेगळे प्रकार वाजवणे, दुगुण करणे.
  • पारंपारिक आरती व वेगवेगळी दादरा तालातील गीते यांना साथ करताना अनुरूप प्रकारांचा उपयोग करणे. प्रात्यक्षिकासाठी गायक असणे आवश्यक आहे व तो आणणे हि परीक्षार्थीची जबाबदारी आहे.
  • उपरोक्त तालमधले बोल वाजवतांना, तबला व डग्गा यांवरील बोटांची स्थिती कशी हवी व त्याचे परिणाम काय याविषयी माहिती.
  • तबला व डग्गा या वाद्यांचे जतन करणे विषयी माहिती.
  • व्याख्या – सम, काल, मात्रा, बोल, आवर्तन