कार्य :

“श्री सशा ” च्या स्थापने मागे एक विशिष्ट प्रेरणा होती. ती म्हणजे सुगम संगीत या विषयासंबंधी समाजाची गरज कोणती आहे ते शोधणे आणि तिची पूर्तता करण्यासाठी,  प्रयत्न करणे, संगीत विषयाचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण इतकेच नव्हे तर परिक्षणाची सोयी, लाभार्थीच्या जास्तीत जास्त निकट उपलब्ध करून देतांना, वरील दृष्टीकोन सतत नजरेसमोर ठेवणे.

“श्री सशा ” ने या विषयक प्रथम निरीक्षणाचा उपक्रम (सर्वे ) सुरु केला त्यामध्ये असे आढळ ले कि, संगीत हा विषय शिकवा असे वाटणारा वर्ग, समाजात खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्या मानाने शिकविण्याची सोय ही फारच कमी आहे, अपुरी आहे असे म्हटले तरी चालेल. एकतर संगीत विषयी हजारो वर्षे केवळ ” गुरुकुल ” पद्धतीने शिक्षण दिले जात होते. त्यामुळे त्याचा लाभ, समाजातील सर्व स्तरांना मिळत नव्हता. ” वर्ग शिक्षण ” पद्धतीने (कलासरूम एजुकेशन ) संगीत शिकवावयाला सुरुवात केली . ती कै. पंडित वि. द. पलुस्कर यांनी १९०१ सालापासून. ह्या ११८ वर्षात त्याचा प्रसार फारच झपाट्याने झाला हे खरे आहे. परंतु तरीही मागणीचे प्रमाणात, सुगम संगीत शिकविण्याची सोय पुरेशी नाही, असेच म्हणावे लागेल. ह्या विषयीही एक महत्वाचे निरीक्षण म्हणजे प. पलुस्करांनी अ. भा. ग. मंडळ हया संस्थेद्वारा संगीत शिक्षणासाठी पुरवलेल्या सोयींमध्ये, देखील ” रागदारी संगीत “ एवढ्या भागाचाच अंतर्भाव झालेला आहे. सुगम संगीत, लोक संगीत वगैरे विषयांचा अंतर्भाव झालेला नाही. खरे तर सुगम संगीत शिकविण्याच्या सोयीचीच मागणी फार अफाट आहे.  सांख्यिकीय भाषेत अगदी ढोबळ मानाने, म्हणायचे तर असे म्हणावे लागेल कि संगीत शिकावे असे वाटणार समाजाचा ७० % ते ८०% भाग हा सुगम संगीत शिकविण्याची मागणी करणारा आहे. आणि तिची पूर्तता करण्यासाठी नाम मात्र ( फक्त छंद या दृष्टीतूनच पहिली तरीही ) सोय हि स्थिती. संगीताचा उपयोग छंदाव्यतिरिक्त शरीर मनाची सुदृढता तसेच तनमन चे आरोग्य यासाठी देखील होतो. या दृष्टिकोनातून समाजामध्ये सजगता (अवेअरनेस ) होईल तेव्हा हे मागणीचे प्रमाण प्रचंड वाढेल.  रोग प्रतिकार शक्ती वाढणे, तसेच रोगनिवारण यासाठी उपचार पद्धत ( थेरपी ) हे हि सामर्थ्य संगीतात आहे. परंतु या दृष्टीने, त्याच्या उपयुक्ततेकडे फारसे पहिलेच जात नाही. एकूण काय, सुगम संगीत शिक्षणाच्या मागणीच्या प्रमाणात शिकविण्याच्या सोयी खूपच कमी आहेत.

अशी स्थिती असण्याच्या काय कारण असेल याचा शोध घेतांना असे आढळले कि, संगीत शिकविणाऱ्या प्रशिक्षित शिक्षकांचा तुटवडा, हे त्याचे मुख्य कारण, आणि हा तुटवडा असण्याचे कारण मात्र, कालबद्ध तसेच विविध वयोगटासाठी उपयुक्त अशा अभ्यासक्रमाची उपलब्धता नसणे हे होय.

शिक्षणाच्या ज्या सोयी, गांधर्व महामंडळ तसेच अलीकडच्या काळातून विद्यापीठ स्तरावर उपलब्ध आहेत त्याद्वारे एक विशिष्ठ वयोगट लाभ घेऊ शकतो. शिवाय त्यांनी फक्त हि सोया विद्यापीठ स्तरावरच पुरविली आहे. सर्व कॉलेजमधून ही सोय उपलब्ध नाही. गांधर्व महामंडळ फक्त रागसंगीत ह्याविषयीचीच सोया पुरविते. संगीतातील अन्य विभागांची शिकविण्याची सोया तर सोडाच पण अभ्यासक्रमही त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत.