श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था

( Recognised and Affiliated by Institutes of Government of India )

 

संस्थेविषयी –

श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था ( यापुढे ” श्रीसशा “ असा उल्लेख असेल ) हि एक जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी नोंदणीकृत झालेली संस्था आहे. सुगम संगीत विषयाचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण व परीक्षण करणे या उद्देशाने स्थापन झालेली संस्था आहे. भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय पुरस्कृत – ” जनशिक्षण संस्थान रायगड (भूतपूर्व श्रमिक विद्यापीठ) तसेच ” नेहरू युवा केंद्र “ यांनी मान्यता प्राप्तता व संलग्नता दिलेली संस्था आहे.

    • महिलांनी मुख्यत्वे महिलांसाठी स्थापन केलेली हि संस्था प्रामुख्याने सुगम संगीताच्या प्रचार, प्रशिक्षण, परीक्षण यांना वाहिलेली संस्था आहे.
    • संस्थेची चार राज्यामध्ये १०० चे वर केंद्रे असून ३०० पेक्षा जास्त संलग्न प्रशिक्षक आहेत.
    • सुगम गीत गायन, सुगम हार्मोनियम, सुगम तबला, सुगम गिटार, सुगम कीबोर्ड, सुगम नृत्य असे विविध अभ्यासक्रम असून, ” सुगम संगीत प्रशिक्षक प्रमाण पत्र ” हा कोर्स जनशिक्षण संस्थान रायगडसह संयुक्त आहे आणि नाट्य संगीत अभ्यासक्रम

संस्थेचे अन्य विनाशुल्क समाजोपयोगी उपक्रम –

१.   ओंकार साधना – प्राणायाम वर्कशॉप ( मोठा गट )

२.   ” ओम – गेम   “ खेळाचे माध्यमातून ओंकार साधना ( वयोगट ५ ते १० )

३.   या शिवाय – संस्थेद्वारा – ” आवाज साधना  “ ( व्हॉइस कल्चर आणि सुगम गीत स्व:अध्ययन ( डिस्टंट एजुकेशन ) सारखे कोर्सेस घेतले जातात )