फायदे, वैशिष्ट्ये आणि अन्य उद्देश :

  • छंदातून व्यवसाय , मनाची भूक भागविणे.
  • शरीर मनाच्या आरोग्याचे संवर्धन
  • या विषयाची मनापासून आवड असणाऱ्यांना अल्पकाळ ट्रैनिंग घेऊन सुगम संगीत वर्ग सुरु करता येतो. एक दोन सेमिस्टरचा अभ्यासक्रम शिकून घेतला कि, तो शिकविता शिकविता शिक्षक स्वतःची सक्षमता, गुणवत्ता एकीकडे वाढवू शकतो.
  • कमीत कमी भांडवल, एक हार्मोनियम पुरेशी होते. ती वाजविता आलीच पाहिजे असे नाही. एका स्वरावर शिकविता येते.
  • प्रत्येकाला उपलब्ध होईल त्या वेळेनुसार करणे शक्य.
  • प्रतिदिन उपलब्ध वेळ असेल तेवढा घ्यायचा.
  • महिलांना गृहकर्तव्ये निभावून जो वेळ उरेल त्यात करता येण्यासारखा गृहउद्योग.
  • घरातील एका खोलीत साधकाच्या खोलीत सुरु करता येण्याजोगा व्यवसाय.
  • प्रशिक्षक कोर्समधील शिक्षण घेणाऱ्याला प्रत्यक्ष शिकविण्याचे “प्रॅक्टिकल” करणे समाविष्ट आहे.