सुगम संगीत प्रमाणपत्र – अभ्यासक्रम

सध्याच्या काळात सर्वच ठप्प झालेले आहेत. आरोग्याचं नव्हे तर उद्योग व अर्थकारणावर करोना महामारीने घाला घातला आहे. ही परिस्थिती किती काळ चालणार याची पूर्ण अनिश्चितता आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेने एका शॉर्ट कोर्सची निर्मिती केली आहे. सदर कोर्से हा ऑनलाईन असेल. जमेल त्याप्रमाणे वैयक्तिक अथवा कॉन्फेरंस कॉल वर शिकविता येईल. त्याची परीक्षा असेल व त्याचे प्रमाणपत्रही उपलब्ध होईल. (सदर अभ्यासक्रम मुख्य निर्मिती साहाय्य आपल्या संस्थेच्या आजीव सदस्या सौ. अंजली नातू, पुणे यांचे आहे. )

उद्देश आणि हेतू –
सुगम संगीताचा परिचय व्हावा हा हेतू म्हणून त्यात सुगम संगीतातील बहुतेक सर्व गीतप्रकार असतील. तसेच सुगम गीतगायनाला लागणारे ४ मुख्य ताल ( झपताल व त्रिताल सोडून ) ४ मुख्य स्वरालंकार व सामान्य माहिती द्वारा सुगम संगीत विषयाचा ” परिचय ” करून देणे.

लाभार्थी –
१५ वर्षावरील फक्त महिला. पण सध्या नियमित सुगम संगीत शिक्षण घेत नसलेले साधक. जे साधक नियमित वर्गात येतात त्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवता येते. अनेक ठिकाणी ते सुरुही आहे. पण ज्यांना नियमित वर्गात येता येत नसते व आता काही वेळ उपलब्ध आहे ते साधक. अर्थात नियमित कलासला येणार्यांनाही शिवाय हेही शिकायचे असेल तर त्यांना प्रतिबंध नाही.

परीक्षा – सदर शॉर्ट सर्टिफिकेट कोर्सची परीक्षा १०० गुणांची असेल व त्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळू शकते.

अभ्यासक्रम –
” गीतगायन ” : भक्तीगीत, भावगीत, अभंग , अंगाई, भूपाळी, गवळण व गझल या ७ गीतप्रकारातील एकेक म्हणजे एकूण ७ गाणी शिकवणे.

” स्वरालंकार ” : १) सा रे ग म प ध नि सां २) सारेग, रेगम, गमप, मपध, पधनी, धनिसां ३) साम, रेप, गध…. ४) सारे साग साम साप ……

” ताल ” : दादरा, कहेरवा, वारकरी (भजनी), रूपक

” सामान्य माहिती ” : १) सुगम संगीतात काय शिकावे लागते. स्वर, ताल, भाषा, व्याकरण, शब्दोच्चार, वर्णोच्चार वगैरे २) गीत प्रकारांची तुलना

प्रशिक्षण काल व स्वरूप (संक्षिप्त) : एकूण प्रशिक्षण काल हा १० तासांचा असेल. प्रत्येक सत्र (सेशन) १ तासाचे (६० मिनिटांचे) असेल.

पहिल्या २ सत्रात अनुक्रमे २० मिनिटे हि थेरीसाठी (सामान्य माहितीसाठी) व त्या सत्रात १० मिनिटे ताल व १० मिनिटे स्वरालंकारसाठी असतील. उर्वरित २० मिनिटात १ अभंग शिकविणे. त्या पुढील ६ सत्रातून ताल व स्वरालंकार १०/१० मिनिटे झाली कि उर्वरित प्रत्येक सत्रातील ४० मिनिटांमध्ये उर्वरित ६ गीतप्रकर भक्तीगीत भावगीत भूपाळी अंगाई व गझल शिकविणे. सत्र ९ व्या मध्ये उजळणी (revision) व १० व्या सत्रामध्ये परीक्षेचे स्वरूप समजावणे.

परीक्षेचे स्वरूप –

१. गीतगायन ७० गुण सर्व गीतप्रकारातील १/१ गीत स्थायी व १ अंतरा गाणे.
२. स्वरालंकार १० गुण परीक्षक सांगतील तो अलंकार म्हणणे.
३. ताल १० गुण परीक्षक सांगतील तो ताल हाताने टाळी व खाली (काल) दाखवून तोंडाने बोल म्हणून दाखवणे.
४. सर्वसाधारण माहिती १० गुण गीतप्रकारांची तुलना. सुगम संगीतात शिकण्याच्या गोष्टी यावर प्रश्नोत्तरे.

परीक्षा ऑनलाईन होतील. परीक्षा तानपुरा मशिन किंवा हार्मोनियम वर एक स्वर (सा) धरून घेतल्या जातील. जिथे शक्य असेल तेथे हार्मोनियम वर संगत करता आली तर त्याला प्रतिबंध नाही. तसेच तबल्याचेही. अन्य कोणतेही वाद्य घेता येणार नाही.

परीक्षेचे काल व स्वरूप : सविस्तर –

प्रशिक्षण काळ १० तासांचा. प्रत्येक सत्र १ तासाचे ( ६० मिनिटांचे ) असेल. विभागणी खालीलप्रमाणे.

सत्र पहिले : सुगम संगीत म्हणजे काय. त्यामध्ये गीतप्रकार कोणते येतात. त्याची तौलनिक माहिती. वेळ २० मिनिट .
स्वरालंकार वेळ १० मि. – सा रे ग म प ध नि सां
ताल दादरा वेळ १० मि.
अभंग स्थायी व १ अंतरा वेळ २० मि.

सत्र दुसरे : सुगम संगीतात काय शिकायचे. स्वर ताल तर सर्व गायनात हवे. पण भाषेची माहिती, व्याकरण, शब्दोच्चार, विरामचिन्हे वेळ २० मिनिट

स्वरालंकार : सारेग, रेगम ……..वेळ १० मिनिट

ताल : केहरवा ……. वेळ १० मिनिट

अभंग : उर्वरित अंतरे …. वेळ २० मिनिट

सत्र तिसरे ते सत्र आठवे : १० मिनिट उर्वरित ताल , १० मिनिट उर्वरित स्वरालंकार, ४० मिनिट उर्वरित गीतप्रकार

सत्र नऊवे ते दहा : वरील सर्वांची उजळणी व परीक्षेचे स्वरूपसंबंधी माहिती व तयारी.

ऑनलाईन कोर्स संबंधीत व्हिडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

सदर कोर्स शिकण्याची फी रू. २००० असेल. ती संबंधित (संचालकाला) शिक्षकांना देय असेल. आणि परीक्षा फी रू. ५०० ही संस्थेला देय असेल. (एकूण फी रू . २५००)

सदरील ऑनलाईन कोर्स उत्तीर्ण झालेल्याना संस्थेच्या ” गीत माध्यमा ” या परीक्षेला थेट (direct) बसता येईल.

संपर्कासाठी  –

  • सौ. शिवाली रानडे – ७७३८४७८६०२
  • सौ. मनिषा फडके – ९९२२९३५५६९
  • श्री. श्रीकान्त रानडे – ९८२०९३९४७४ ( by appointment )