माझी मुलगी प्राजक्ता लिमये थोडी गतिमंद आहे, तिची बारावी झाली, शास्त्रीय संगीताची प्रवेशिका प्रथम झाली आहे. आता रागधारी जमत नाहीये म्हणून मी सुगम संगीताचा क्लास शोधत होते. आता लोकडाऊन मध्ये अवघड झाले होत शोधणं, पण तिच्याच गोळवलकर शाळेतील वर्ष करंदीकर ताईनी अंजली नातू मॅडमच नाव सुचवलं आणि ऑनलाईन क्लास ला सुरुवात झाली. खूपच मस्त अनुभव ऑनलाईन क्लासचा, मी असा ऑनलाईन क्लास पहिल्यांदाच अनुभवाला. आमच्या चुका परत परत दुरुस्त करून घेतल्या, रोज नवीन गाणं शिकायला मजा आली, तालाची, अलंकारांची, सुगम संगीतातल्या प्रत्येक प्रकाराबद्दल माहिती सगळं छान समजावुन सांगितलं आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद अंजली ताई
Online short courseadmin2022-06-15T14:56:42+05:30