गीत उपांत्य :
१. गीते : एकूण अठरा गीते . ज्यात मागील सर्व प्रकार व एक गीत झापतालामधील
२. ताल : दादरा ,केहरवा, भजनी (वारकरी ) , रूपक आणि झपताल माहिती व प्रात्यक्षिक ( हाताने दाखविणे ) व तबल्यावर वाजविलेले ताल ओळखणे.
३. स्वरालंकार : स्वतंत्र तक्त्यातील क्र . १ ते ७. गीत गायनात स्थायी अंतरा एका स्वरावर सुरु करतांना स्वरालंकाराचा कसा उपयोग होतो याची माहिती व प्रात्यक्षिक.
४. सर्वसाधारण माहिती : मागीलप्रमाणे शिवाय स्पर्धांचे संदर्भात गीताची निवड, सादरीकरण, परीक्षण वैगरे.
५. सभागायन – साधकाच्या निवडीचे एक गीत व परीक्षकांच्या निवडीचे दोन गीत अशी तीन गीते सभेपुढे सादर करणे.
६. रागसंगीत : राग भूप. यमन, बागेश्री आणि मालकंस यांची माहिती व आरोह-अवरोह ( सरगम नाही )
७. काव्यवाचन : परीक्षकाने दिलेल्या कवितेचे.