छान आयोजन, वेळेत सुरु होऊन वेळेत आयोजन पूर्ण करणे, मोजके विषय घेऊन त्यावर छान माहिती आणि चर्चा, खाण्या पिण्याची उत्तम सोय, २२ श्रुती आणि क्लासिकल चे सत्र खूपच छान. एकूणच, सुंदर वर्क शॉप मध्ये हजेरी लावल्याचा आनंद मिळाला. माधुरी आणि शिवली मॅडमचे आभार

सुप्रिया मुळे

,

९ आणि १० मार्च २०१९ या तारखेची कार्यशाळा खूप छान झाली. सर्व सत्रातील माहिती खूप उपयुक्त होती.

  •  नांदेडकर
Your Content Goes Here

दोन्ही दिवसाचे वर्क शॉप खूपच चॅन झाले. बहुमूल्य मार्गदर्शन अगदी सहज सोप्या भाषेत मिळाले. आभारी

वर्षा मोने

Well organised workshop and very informative.. We learned a lot.  It enhanced our knowledge regarding Omkar Chanting and Shastriya Sangeet, Thanks to Shivali Mam…

Manjusha

आपली दोन्ही दिवसाची कार्यशाळा खूप छान झाली. ओंकार, गान श्वसन, स्वर म्हणजे काय ? या बेसिक पासून गाणं म्हणजे काय ? गाणं गातांना त्यातील भाव व्यक्त करणे कसे महत्वाचे आहे. या सर्व महत्वाच्या गोष्टी शिवली मॅडम यांनी प्रात्यक्षिकासह सुरेख समजावून दिल्या. वेगवेगळे ताल अनेकवेळा प्रत्यक्ष वाजवून आम्हाला श्री. अमोल यांनी त्यांची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी श्रुतीची माहिती सांगितल्या नंतर थेट रागदारीची तोंड ओळख आम्हाला करून देण्यात आली.
अक्षय आणि सावनीने खूप चॅन आणि सोप्या पद्धतीने राग, हिंदुस्थानी संगीतातील वेगवेगळी घराणी, त्यांची वैशिष्ट्ये, प्रातिनिधिक उदाहरणांनी प्रात्याक्षिकांसह समजावून सांगितली. सोप्या व रंजक भाषेत सांगितल्याने पोहचविण्यात दोघेही यशस्वी झाले.

अनुपमा कर्णिक

अप्रतिम नियोजन व महत्वाची माहिती मिळाली. रागदारी संगीताबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. एकूण कार्यशाळा उपयुक्त ठरली. ओंकार साधना व आवाज साधना इत्यादी बद्दल बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. शिवली मॅडम चे खूप आभार.

अभिलाषा शेटकर

ओंकार साधनेची ९ आणि १० मार्च २०१९ ची कार्यशाळा प्रत्येकाने शिकण्यासारखी होती. पहिल्या दिवसाची ओंकार, श्वसन त्याचा गातांना कसा उपयोग करावा या बद्दल ची माहिती खूपच उपयुक्त होती. दुसऱ्या दिवसाची रागाची माहिती अक्षयने खूपच छान प्रात्यक्षिकांसह सांगितली. धन्यवाद

सौ. श्रद्धा नरेंद्रकुमार सोहोनी

Suniyoujit niyoujan, workshop sathi ghetalela aabhyaskram aabhyasachya, class ghenyachya drushtine khoop mahatavapurn , 22 Shruti & Classical satra khoop sahaj aani sopya padhatine samajavale. Punha – Punha Workshop che Aayojan karave

अत्यंत उत्तम ” राग संगीत सुगम संगीत कार्यशाळा ” उकार, आवाज व उच्चारशास्त्र, काव्यवाचन, लय, तालानुसार गीत गायन सादरीकरण या संदर्भात विस्तृत, सखोल माहिती मिळाली. विविध तालांचे उपयुक्त प्रात्यक्षिक तसेच २२ श्रुती, राग ओळख, त्यावर आधारीत सुगम संगीत याबाबत खूप छान व गीत गायनाच्या दुष्टीने महत्वाची माहिती मिळाली. तसेच चक्रबीजाक्षरे मंत्राबाबत गणाच्या तसेच आरोग्याच्या दुष्टीनेही चांगले मार्गदर्शन, प्रात्यक्षिकसह मिळाले. त्या बदद्ल सौ. शिवली, श्री अमोल, ची. सावनी व ची. अक्षय यांचे आभार. विविध रागांवर आधारित एक स्वतंत्र कार्यशाळा घ्यावी अशी नम्र सूचना.

सौ. स्नेहल दामले

ओंकारचे प्रकार खूप छान समजले, भाव समजून गाणे गट आले पाहिजे. माहिती खूपच छान

सुनीता म्हात्रे

व्यवस्थित नियोजन, खूप महत्वाची माहिती, सखोल मार्गदर्शन आम्हा सर्वाना उपयुक्त होते असे… धन्यवाद शिवली मॅडम, माधुरी मॅडम, सावनी आणि अक्षय. .अशा अनेक कार्यशाळा व्हाव्यात हि विनंती.

दोन्ही दिवसाचे वर्क शॉप नियोजनबद्ध झाले. खूप छान. गाण्यातले बारकावे (शब्दांचे उच्चार) सूर, ताल यांचे सखू मार्गदर्शन मिळाले. मनःपूर्वक धन्यवाद

माधुरी लाड