मी शर्वरी वैद्य आज शिवली रानडे यांच्या शिबिराला उपस्थित होते. त्यांनी आम्हाला श्वासाचा गाण्याशी असलेला संबंध खूप सुंदर रित्या समजावून सांगितला, त्याचप्रमाणे ओंकार करण्याच्या अनेक पद्धती समजावून दिल्या, ज्यांचा संगीतासाठी नव्हे तर संपूर्ण व्यक्तित्वाच्या विकासासाठी आम्हाला फायदा होईल. त्याचप्रमाणे गाण्यांमध्ये सूर आणि लय याबरोबरच शब्दोच्चार आणि भावना या किती महत्वाच्या असतात त्याचे महत्व आम्हाला समजले. आता ताईनी जे शिकविले आहे त्याचा रोज सराव करून त्यात प्राविण्य मिळविण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. ताई तुमच्या शिबिराला उपस्थित राहण्याची संधी तुम्ही दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
दि. २८ व २९ जून रोजी मॅडम शिवली रानडे यांनी घेतलेल्या सुगम संगीत विषयक कार्यशाळेत उपस्थिती राहण्याची संधी मला मिळाली. गाणे गाताना कोणकोणत्या बाबी महत्वाच्या असतात. त्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांविषयी मी बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ होते. या दोन दिवसांच्या कार्यशाळेत मॅडमनी जे अतिशय सोप्या, विस्तारित व रंजक पद्धतीने मार्गदर्शन केले ते अतिशय मोलाचे आहे. तसेच अक्षय वार्धवे यांनी हि रागांवर आधारित खूप छान माहिती दिली. या मार्गदर्शनाचा मला नक्की फायदा होईल. यापुढेही अशा प्रकारच्या कार्यशाळेचा प्रशिक्षणार्थीना लाभ द्यावा हि सदिच्छा. मॅडम आपणांस खूप खूप सदिच्छा व धन्यवाद !
My name is Anupama Date attended this amazing workshop conducted by Shivali Ranade which included Omkar therapy, correct breathing technique and correct pronunciation of words due to which a song can be sung beautifully. Her demonstrations were superb and easy to understand. These were things that we rarely get to learn anywhere. A big thanku to u mam!! , I m very very grateful to u for all the knowledge gained ♠
मी अनिता जगीरदार, शिवाली रानडे ह्यांनी २७ व २८ जुन २०१९ रोजी ठाणे येथे घेतलेल्या कार्यशाळेत उपस्थित होते. ह्या कार्यशाळेत गायन सुरेल आणि भावपूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या श्वासावर नियंत्रण, ओंकार उच्चारण शिक्षण आणि मुळाक्षरे उच्चार पद्धती या द्वारे अतिशय सोप्या पद्धतीने व खेळीमेळीने समजावून सांगितले. दोन दिवस अगाध ज्ञान प्राप्त झाले. खूप खूप धन्यवाद ….