माझी मुलगी प्राजक्ता लिमये थोडी गतिमंद आहे, तिची बारावी झाली, शास्त्रीय संगीताची प्रवेशिका प्रथम झाली आहे. आता रागधारी जमत नाहीये म्हणून मी सुगम संगीताचा क्लास शोधत होते. आता लोकडाऊन मध्ये अवघड झाले होत शोधणं, पण तिच्याच गोळवलकर शाळेतील वर्ष करंदीकर ताईनी अंजली नातू मॅडमच नाव सुचवलं आणि ऑनलाईन क्लास ला सुरुवात झाली. खूपच मस्त अनुभव ऑनलाईन क्लासचा, मी असा ऑनलाईन क्लास पहिल्यांदाच अनुभवाला. आमच्या चुका परत परत दुरुस्त करून घेतल्या, रोज नवीन गाणं शिकायला मजा आली, तालाची, अलंकारांची, सुगम संगीतातल्या प्रत्येक प्रकाराबद्दल माहिती सगळं छान समजावुन सांगितलं आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद अंजली ताई
Anjali Madam Thanks a ton !!
Thanks for bringing happiness in our lives….
Thanks for creating an opportunity during this time..
Thanks for letting us know about our own voice…
Thanks for conducting short term course online…
I can only say ….It was my best decesion that I took to join…
Apart from that I got very loyal and hard working friends including Anjali Madam.
Anjali Madam very polite and down to the earth person.
It was really unexpected awesome experience during this lockdown which has turned into a beautiful memory !!!!
Thanks for each and everything !!!
मला हि कधीच वाटले नाही कि मी गाणं म्हणू शकेन , मनात गाणं शिकायची इच्छा होती पण ती राहून गेली. तुमच्या ऑनलाईन कलासेसमुळे ते शक्य झाले. खूप छान कलासेस झाले.
सौ. प्राची अजित डोंगरे , मी नाशिक ची आहे. ऑनलाईन सिंगिंग क्लास हि कल्पना खूपच छान होती. खूप छान अनुभव मिळाला. अंजली मॅडम ने सगळा syllabus cover केला. सुगम संगीताचे basic knowledge मिळाले. सगळ्या प्रकारची गाणी घेतली.
Thank you so much. परत ऑनलाईन क्लास करायला नक्की आवडेल.
Thank you so much Anjali Madam,
मी शुभांगी जोशी, अमरावती लॉकडाऊन पण इतका छान होऊ शकतो हे तुमच्यामुळे कळले. लहानपणापासून गाणं शिकावं असे मनात होते पण कधी शक्यच झाले नाही पण तुमच्या या ऑनलाईन क्लास मुळे माझी इच्छा पूर्ण झाली अर्थात गाणं पूर्ण शिकले असे नाही पण छान गुणगुणायला लागले.