पार्श्वभूमी :
सुगम संगीत शिकण्याची मागणी खूप असून सुद्धा शिकण्यासाठी फक्त नाममात्र सोयी होत्या. सुगम संगीत शिकविण्याची सोय, सर्व दुर असणे ही एक मोठी सामाजिक गरज होती. तिच्या पूर्ततेसाठी विविध अभ्यासक्रम निर्माण करणे ते शिकविण्यासाठी प्रशिक्षित प्रशिक्षक तयार करणे गरजेचे होते. समर्थ शारदाने या सामाजिक गरजेच्या पूर्ततेसाठी पुढाकार घेतला आणि त्याद्वारे सुगम संगीताचा प्रचार, प्रसार प्रशिक्षण देण्याबरोबरच, परीक्षण व्यवस्थाही निर्माण केली ती अशी श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेने, पंचेचाळीस (४५) परीक्षांच्या त्रिस्तरीय अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. त्यापैकी एक म्हणजे मोठ्या वयोगटासाठी `सुलभ अभ्यासक्रम` या अंतर्गत सहा परीक्षांचा अभ्यासक्रम (सहावी परीक्षा गीत विशारद पर्यतचा) आहे.
संस्थेची संलग्न असलेल्या संचालकांच्या अनेक विद्यार्थ्यांनी तो पूर्ण केला आहे. त्या विद्यार्थ्यांनी या पुढे काही शिकायचे असते. म्हणून त्यांना झेपेल असा, उपयुक्त व फारसा कठीण नसणारा अभ्यासक्रम तयार केला जावा अशी मागणी होत आहे. हि मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करणे गरजेचे होते, तो म्हणजे ” गीत अलंकार ” आभ्यासक्रम, त्याच बरोबर सुगम हार्मोनियम, सुगम तबला, सुगम नृत्य, सुगम गिटार, सुगम की बोर्ड यांचे अभ्यासक्रमही तयार केले आहेत
उद्देश :
उपरोक्त मागणीचा पूर्तता करताना, केवळ गरजेची पूर्तता एवढाच उद्देश ठेवून चालणार नव्हते. अभ्यासक्रम निर्माण केला तर त्याची बहुविध उपयुक्तता असायला हवी. संस्थेच्या तज्ज्ञ सदस्यांमध्ये ह्यावर चर्चा झाल्या. त्यामधून असे लक्षात आले कि ‘ गीत विशारद ‘ पर्यंत शिकलेले साधक, हे स्वर , ताल, स्वरालंकार, निवडक राग, काव्यवाचन, विविध गीतप्रकार अशा मूलभूत गोष्टीं व किमान वीस गाणी साधकाने शिकलेली असतात. याचा उपयोग त्यांना कार्यक्रम करण्यासाठी व्हायला हवा. त्यांना त्यांच्या कार्यक्रमाचे निवेदन करता यायला हवे. किमान काही वेळ एकट्याने कार्यक्रम करण्याचा आत्मविश्वास संपादन करायला हवा हा हेतू ध्यानात ठेवला, तर अन्य भागाकडील गोष्टींचा व्दिरूक्ती टाळून ” सादरीकरण ” या गोष्टीकडे पूर्ण लक्ष द्यायला हवे. थोडक्यात ” गीत विशारद ” झालेले साधक, आत्मविश्वासाने एकट्याचा कार्यक्रम करतील असा असावा, असा सर्व चर्चांचा सूर होता. त्यानुसार नवीन अभयासक्रमाचे खालीलप्रमाणे उद्धेश ठरविण्यात आले.
-
- ताल, सूर, स्वरालंकार, काव्यवाचन, रागसंगीत आणि सर्वसाधारण माहिती हा भाग पूर्णपणे वगळण्यात यावा.
- एका स्वरावर गाणे, वाद्यांशिवाय गाणे यांनाही पूर्णपणे फाटा द्यावा. परीक्षकांचा चॉईस, साधकांचा चॉईस या गोष्टी नसाव्यात.
- साधकाने विविध गीत प्रकार असलेली दहा गीते हि ‘सभागायन’ अथवा कार्यक्रम करण्याच्या पद्धतीने सादर करावीत. त्याला फक्त हार्मोनियम आणि तबला अथवा मृदूंग एवढ्याच वाद्यांची साथ असावी.
- कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जाणारा असावा.
- साधकाने स्वतःच गाण्याचे निवेदन करावे.
- परीक्षेमध्ये साधकाने गरज पडल्यास वहीचा वापर करावा.
- निवेदन मात्र लिहिलेले वाचून दाखवू नये. एकूण श्रोत्यांशी सतत संवाद राहिला असे सादरीकरण हवे.
- कार्यक्रमात गीते निवडताना गीतप्रकाराप्रमाणेच तालाची विविधता असावी. सादरीकरणाचा क्रम लावत असताना प्रथम कोणते गीत गावे. शेवट कशाने करावा याविषयीचे पारंपरिक संकेत पाळले जावेत. ( उदा. भैरवीने शेवट करावा. सुरुवात भूपाळी / गणेश वंदना याने व्हावी. )