संस्थेचा – विशेष – आगळा वेगळा उपक्रम
आवाज साधना ( Voice Parlour )

आवाज साधना, संगोपन, संवर्धनासाठी – व्हॉईस पार्लर्स

  •  एकेकाळी ” ब्युटी पार्लर्स ” नव्हती !
  •  ती आता जागोजागी आहेत ना !
  •  तशीच आतापर्यंत नव्हती, पण आता आम्ही सुरु करीत आहोत ” व्हॉईस पार्लर्स “
  •  या पार्लर्समध्ये ही ” ब्युटी पार्लर्स ” प्रमाणे नियमित, नैमित्तिक विविध प्रकारे लाभ घेता येतील.

संपर्क :

सौ. मनीषा फडके (९९२२९३५५६९) / सौ. शिवाली रानडे-पारेकर (७७३८४७८६०२)

व्हॉईस पार्लर्स
अर्थात आवाज संगोपन – संवर्धन

  • ४०/५० वर्षांपूर्वी, ब्युटीपार्लर्सची संकल संकल्पना पचवणे कठीण होते. आपल्या आजी/पंजीनी याला ‘ खूळ ‘ म्हणून वेड्यात काढलं असत.
  • आज गल्लोगल्ली जोमाने चालणारी ” व्हॉईस पार्लर्स ” त्याची अपरिहार्यता सिद्ध करतात.
  • व्यक्तिमत्व विकास, सादरीकरण यामध्ये देहाच्या सौंदर्यवर्धनाची गरज ही ” व्हॉईस पार्लर्स ” मुळे भागवणे शक्य आहे.
  • व्यक्तीची हुबेहूब ” डमी ” करता आली तरी, व्यक्तीचा ” आवाज ” ही त्याची खरी ओळख ( आयडेंटी ) जिची नक्कल केली, तरी ती उघडी पडते.
  • ” आवाज ” हाच व्यक्तिमत्वाच्या विकासातील खरा महत्वाचा भाग, पण जोपासना, त्याचे ” सौंदर्यवर्धन ” या विषयाची सजगता म्हणावी तशी कुठे आहे ?
  • परदेशात मात्र आवाज जोपासना, संवर्धनासाठी अनेक ” व्हॉइस पार्लर्स ” आहेत. एवढेच नव्हे तर तिथे नियमितपणे जाणार्यात, फक्त गायक, निवेदक, शिक्षक, वकील, समुपदेशक ही मंडळीच नव्हे, तर सामान्य माणसेही जातात. ” आवाज ” विषयी सजगता व ” व्हॉइस पार्लर्स ” ची पुरेशी उप्लबद्धता यामुळे हे शक्य होते.

सजगता ही हळूहळू येते, आपल्याकडेही ती येईलच
” श्री समर्थ शरद सुगम संगीत संस्था ”
याचसाठी सुरु करीत आहे ” व्हॉइस पार्लर्स “

व्हॉईस पार्लर्सचे लाभार्थी

  • गायक-विशेषतः हौशी गायक, ज्येष्ठ नागरिक, भजनप्रेमी, गाणे म्हणजे हा प्रत्येकाचा हक्क आहे.
  • निवेदन, सूत्रसंचालक
  • शिक्षक, प्राध्यापक
  • वकील, समुपदेशक
  • विक्रेते, मार्केटिंग क्षेत्रातले
  • सामान्य माणसे – जी व्यक्तिमत्व विकास करू ईच्छितात
  • विचारांची देवाण – घेवाण करण्यासाठी प्रत्येकाला आवाजाची गरज आहे. तशीच आवाज जोपासना, संगोपनाची
  • आवाजाच्या तक्रारी असणारे
  • आपले गायक अधिक प्रभावी करू इच्छिणारे

व्हॉईस पार्लर्स मधल्या सुविधा

  •  आवाज निर्मिती, सुयोग्य श्वसन, स्वासोच्छवावर ताबा मिळविणे, सप्तकानुसार आवाजाचे पोत बदलणे, ओंकार, प्राणायाम, वर्णोच्चार, शब्दोच्चार, व्याकरण या विषयीचा  अभ्यास ( ग्रुपमध्ये एकूण १६ तास कालावधी )
  •  आवाज बसणे, घास दुखणे, आवाज न चढणे वैगरे आवाजाच्या तक्रारी असणाऱ्यांना त्यांची कारणे व उपाय याविषयी अवगत करणे, साधनेसाठी मार्गदर्शन
  •  आवाज निर्मिती करतांना ताण कशाने येतात व त्याचे निवारण्यासाठी करावयाची साधना
  •  संस्था / गायन कलाससाठी याविषयी प्रात्यक्षिकासह विनामूल्य व्याख्यान वेळ दीड ते दोन तास

व्हॉईस पार्लर्स :-

व्हॉईस पार्लर्स म्हणजे सेवा पुरवणाऱ्या शॉपीज, ज्यात ही सेवा ” आवाज संगोपन व संवर्धन ” या विषयी आहे. याच्याशी समाजातील अनेक घटक निगडीत असतात. शिक्षक, प्राध्यापक, वकील, समुपदेशकापासून सामान्य प्रत्येक जण जो ” आवाज ” या साधनाचा वापर करून गोष्टी, अगदी दैनंदिन जीवनामधील गरजा देखील पूर्ण करत असतो, असे सगळे. मात्र या सर्व गटामध्ये ” गायन ” कला ही वेगळी ठरते ती, तिच्यासाठी ” आवाज संगोपन तसेच संवर्धन ” सेवेची गरज सर्वात जास्त लागते, म्हणून.

यासाठी आवाजाच्या या ” शॉपी ” मध्ये आम्ही –

” कंठ संगीताची बालवाडी “ अर्थात फाउंडेशन कोर्स किंवा गायन क्लास मध्ये दाखल होण्यापूर्वी करावयाचा ” प्री-प्रायमरी व्होकल म्युझिक एज्युकेशन कोर्स “ हा ” साधना अभ्यासक्रम बनवला. सोळा तासाचा हा अभ्यास म्हणजे शालेय शिक्षणांत असते तसे आवाज साधनेचे प्ले ग्रुप, नर्सरी, जुनिअर, सिनिअर यांचे बालवाडी शिक्षण.